Dattatreya Khapreमधुरा व्दैताचार्य श्रीगुलाबराव महाराज यांच्या ग्रंथातील विषयांची सूची

श्रीगुलाबराव महाराजांचे शिष्य पंचायनातील दत्तात्रय गणेश खापरे उर्फ भाऊसाहेब यांनी वीस पंचवीस वर्षे अतिशय कष्ट घेऊन मोठ्या आकाराचा सहाशे पानांचा आणि अंदाजे २५ हजार नोंदीचा कोषग्रंथ केला आहे.

यात नोंदवलेला प्रत्येक विषय एका वाक्यात मांडला आहे. त्यामुळे अभ्यासकाला महाराजांचा विचार समजणे सोपे झाले आहे.

महाराजांच्या अफाट ग्रंथ संग्रहातून महाराजांनी कोणते नवे योगदान दिले आहे हे कळण्यात सोपी जाते. हे कार्य अतिशय महत्वाचे अत्यंत कष्टदायक असूनही भाऊसाहेबांनी दिवस रात्र न पाहता हे फार मोठे कार्य करून ठेवले आहे.

१. एका वाक्यात विषय मांडला आहे.

२. त्यापुढे कोणत्या ग्रंथात म्हणजे कोणत्या यष्टीत तो विषय आला आहे याचा संदर्भ आहे.

३. याठिकाणी महाराजांच्या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीतून (१९०७) पृष्ठ क्रमांक घेतला आहे.

४. भाऊसाहेब खापरे जीवित असे पर्यंत एकूण २० खंडांपैकी १५ खंड (यष्टी) मुद्रित होते त्यामुळे पुढील पांच खंडातील विषयांचा अंतर्भाव या मधुकोषात होऊ शकला नाही.

५. त्यानंतरच्या पुढील आवृत्तीत पृष्ठ क्रमांक बदलले. त्यामुळे विषय शोधण्यास कठीण झाले.

६. त्यासाठी नवीन आवृत्त्यात प्रत्येक पानावर पहिल्या आवृत्तीतील पानक्रमांक टाकला आहे.  अभ्यासकांनी वरील बिंदू लक्षात घेऊन जुन्या पहिल्या आवृत्तीवरून विषयाचा शोध घ्यावा. किंवा नवीन आवृत्तीतून संदर्भ पाहावयाचा असल्यास, नवीन आवृत्तीत प्रत्येक पानावर पहिल्या आवृत्तीचा पान नं. टाकला आहे त्यानुसार शोध घ्यावा.

(यष्टी = खंड)

विषय / (यष्टी) – पान / ग्रंथनाम / अध्याय / ओवी / विषय / (२ पू.)  १४ / प्रेमकुंज / अ.  / ओ. ४३

माधुर्य माधुकोष प्रस्तावना

माधुर्य माधुकोष महत्वाच्या सूचना आणि इंडेक्स

Madhurya Madhukosh 1

Madhurya Madhukosh 1

माधुर्य माधुकोष १

Madhurya Madhukosh 2

Madhurya Madhukosh 2

माधुर्य माधुकोष २

Madhurya Madhukosh 3

Madhurya Madhukosh 3

माधुर्य माधुकोष ३

Madhurya Madhukosh 4

Madhurya Madhukosh 4

माधुर्य माधुकोष ४

Madhurya Madhukosh 5

Madhurya Madhukosh 5

माधुर्य माधुकोष ५