श्री गुलाबराव महाराज : जीवन – आलेख

  • श्री गुलाब गोन्दुजी मोहोड / पांडुरंगनाथ / ज्ञानेश्वरकन्या
  • माता – पिता : श्री गोन्दुजी व सौ. अलोकाबाई मोहोड
  • ६ जुलै १८८१, आषाढ शु. १०, अमरावती जवळ लोणीटाकळीत जन्म
  • चवथ्या महिन्यात अंधत्व / अल्पायुषी : वय चौतीस वर्ष.
  • वयाची पहिली चार वर्ष माधानला वास्तव्य.
  • इ. स. १८८५ : मातृवियोग
  • त्या नंतरची सहा वर्ष आजोळी लोणीटाकळीला वास्तव्य
  • या काळात दैवी गुणांचा उदय आणि सर्वज्ञतेचा परिचय, लोकांकडून ग्रंथ वाचून घेण्यासाठी आत्यंतिक परिश्रम.
  • इ. स. १८९६ : विवाह. पत्नी : सौ. मनकर्णिका.
  • इ. स. १८९७ पासून निबंध व अभंगांची रचना, आनंदमार्ग खंडन. पितृवियोग
  • इ. स. १९९० बाल सवंगड्याना अनुग्रह सिरसगाव, चांदूरबाजार, यावली इत्यादी ठिकाणी लोकोद्धारासाठी भ्रमंती. घरच्या विषप्रयोगादी कटकटीना कंटाळून आणि पाटीलकी वरून पाणी सोडून गृहत्याग.
  • इ. स. १९०१ श्री ज्ञानेश्वर माउलींचा साक्षात अनुग्रह.
  • इ. स. १९०२ ग्वाल्हेर चे स्वानंदसाम्राज्यकर्ते जठारांना पत्र त्यात –
  • मानभाव, “डार्विन मतसमीक्षा” स्पेन्सर मतसमीक्षा.
  • स्त्रीगीते : झोपाळा व जात्यावरील लोकगीतांची रचना.
  • पंढरपूर यात्रा, अमरावतीला आगमन.
  • हरिभाऊ केवले या शिष्योत्तामाची भेट.
  • इ. स. १९०३ – कात्यायनी व्रताचा आरंभ देऊरवाडा
  • इ. स. १९०४ – पुनर्जन्माचे संस्मरण – गुजरातेतील झिंजूवाडा येथील सत्पुरुष स्वामी बेचारानंद (इ. स. १७९५ – १८८०)
  • आर्वी चे सत्पुरुष दामोदर आपाजी महाराज यांची भेट.
  • ज्ञानेश्वरीच्या निरुपणास आरंभ.
  • उपलब्ध प्रतीत नसलेली ज्ञानेश्वरीतील ओवी सांगितली.
  • माधुर्यामृतसागरास भरती.
  • विविध विषयांवर निरुपणे.
  • बालसवंगडी व पहिला शिष्य असलेल्या रामचंद्रबापूंना मृत्यूसमयी पुढील महायात्रेसाठी दिलेल्या सूचना.
  • आळंदीवारीचा आरंभ.
  • स्त्रीव्रतांचा आरंभ.
  • रुक्मिणी स्वयंवराची रचना.
  • इ. स. १९०५ – महाराजांचा श्रीकृष्णाशी विवाह.
  • श्रीकृष्णमूर्ती व ज्ञानेश्वरमाउलीच्या पादुकांची नित्यपूजा.
  • प्रियशिष्य आणि उत्तराधिकारी नारायणराव पंडितांची भेट.
  • मुलगा – अनंत याचा जन्म.
  • ल. रा. पांगारकर यांची भेट व लोकनायक बापुजी अणे यांची भेट
  • इ. स. १९०७ नागपूर येथे ज्ञानेश्वर मुद्रणालयाची स्थापना व ग्रंथछपाईला आरंभ.
  • मायर्सच्या ग्रंथाची समीक्षा.
  • वैज्ञानिक जगदीशचंद्र बोसांच्या ग्रंथांची समीक्षा.
  • कलकत्ता येथे प्रा. प्रीयानाथ मुखर्जी कडे मुक्काम.
  • जगन्नाथपुरी यात्रा.
  • योगप्रभाव, चित्तोपदेश व सद्वैजयंती इ. ग्रंथांची रचना.
  • शिवाच्या नित्य पार्थिवपूजनाचा आरंभ.
  • प्रियालीलामोहोत्सावादी ग्रंथांची रचना.
  • इ. स. १९०९ अंतर्विज्ञान संहिता या सूत्र ग्रंथाची रचना व त्यातील ९ सूत्रांवर अलौकिक ९ व्याखाने.
  • वृन्दावनाची यात्रा.
  • इ. स. १९१० – डॉ. मुंजेना पत्र.
  • न्याय वैशेषीकातून भौतिक विज्ञान संबंधी मार्गदर्शन.
  • पुण्याच्या साहित्यसम्राट न. चि. केळकरांशी भेट.
  • इ. स. १९११-१३
  • विविध विषयांवर पत्रे, लेख व अनेक ग्रंथांची निर्मिती.
  • इ. स. १९१४ – श्री निवृतीनाथांचा दृष्टांत.
  • देवासच्या श्रीमंत तुकोबराजे पवार यांना पत्रे व देवास भेट.
  • संगीतकार पं. भातखंडेशी पत्राचार / गानसोपानाची रचना
  • धुळ्याचे सत्पुरुष बाबा गर्दे यांचाशी भेट.
  • २० सप्टेंबर १९१५ – भाद्रपद शु. १२ वामनव्दादशी रोजी पुणे मुक्कामी, चाकण ऑइलमिलच्या परिसरातील वास्तूत शेवटच्या क्षणी देखील स्वताच्या अनुभवाचा दाखला देऊन शास्त्र निष्ठेचा नारायण पंडितांना उपदेश केला आणि सूर्योदयाचे समयी ब्रह्मस्थानी प्रस्थान केले.