डॉ कृष्ण माधवराव घटाटेBhaiyasaheb Ghatate

या वेबसाईटचे निर्माते डॉ. भैय्यासाहेब घटाटे एम.ए., पीएच.डी श्रीगुलाबराव महाराजांवर पहिला पीएच.डी. चा प्रबंध लिहीणारे.

नावडॉ. कृष्ण माधव घटाटे ‘गोकुळ’ घटाटे-ले आउट, श्रीमंत बाबासाहेब घटाटे चौक, सिव्हिल लाईन्स, नागपूर-१ टे.७१२२५३३९९७.

जन्म – १०/१०/१९३५

१९५० पिताश्री बाबासाहेब घटाटे यांनी रा. स्व. संघाची प्रतिज्ञा दिली. व संघ शिक्षावर्ग पूर्ण केला.

१९५४ श्रीगुलाबराव महाराजांचे उत्तराधिकारी सद्गुरू श्रीबाबाजी महाराज पंडित यांनी अनुग्रह दिला.

शिक्षण – एम.ए. पी.एच.डी. (१९७३) ‘श्रीगुलाबराव महाराजांची विचारसंपदा’. या प्रबंधाचे मार्गदर्शक प्रा.श्री.मा.कुलकर्णी होते. तसेच रा. स्व. संघाचे सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरूजी या प्रबंधाचे पहिले वाचक आहेत. या प्रबंधाला पुण्याच्या मराठा-केसरीचे साहित्यसम्राट न.चि. केळकर पारितोषिक मिळाले. १९७९. तत्कालीन पंतप्रधान मा. मोरारजी देसाई यांच्या हस्ते वरील प्रबंधाचे विमोचन दिल्ली येथे झाले. तत्कालीन विदेशमंत्री मा. अटलबिहारी वाजपेयी व संस्कृतातील महाकवि प्रज्ञाभारती डॉ. श्री. भा. वर्णेकर, दिल्लीचे महापौर लाला हंसराज गुप्त व श्रीबाबासाहेब घटाटे हे उपस्थित होते.

लेखन

१. श्रीगुलाबरावमहाराजांची विचारसंपदा प्रबंध (मराठी-हिंदी-इंग्रजी)

२. श्रीगुलाबरावमहाराजांच्या १३९ ग्रंथांचा सारांश (मराठी-हिंदी)

३. श्रीगुलाबरावमहाराजांचा सर्वधर्म  समन्वय विचार (मराठी-हिंदी-इंग्रजी)

४. श्रीगुलाबरावमहाराजप्रणीत विश्वव्यापिनी हिन्दू संस्कृति (मराठी-हिंदी-इंग्रजी-गुजराती)

  • हिंदु इतिहास दृष्टी
  • भारत वैभव गाथा
  • आर्य गमनागमन विकृती
  • वैदिक संस्कृतीचे जागतिक अस्तित्व

५. श्रीगुलाबरावमहाराजांचे भक्तिशास्त्र (मराठी-हिंदी)

  • उपासना आणि भक्ति
  • पराभक्ति
  • ज्ञानदेव उपासना

६. श्रीगुलाबरावमहाराजांचे संक्षिप्त चरित्र. (मराठी-हिंदी)

७. श्रीगुलाबरावमहाराजांनी विज्ञानाला दिलेली आत्मदृष्टी

८. बुवाबाजीचा दंभस्फोट (मराठी-हिंदी)

९. योग विचार

१०. नीति विचार

११. अपराध विचार

१२. काव्य विचार

१३. वेद विचार

१४ साधुकथांतून व्यक्तिमत्व विकास (१८० कथा)

१५. श्री बाबासाहेब घटाटे याचे आत्मकथन आणि सरसंघचालक पूजनीय रज्जुभैया यांच्या हस्ते प्रकाशन.

१६. प. पु. श्रीगुरूजी गोळवलकर यांचा जीवनपट दिनांक वर्षासह (मराठी-हिंदी-इंग्रजी)

इतर

– भक्तिसुधा मासिक ३ वर्षे चालविले.

– १९८१ साली श्रीगुलाबराव महाराजांच्या जन्मशताब्दी उत्सवाचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर आयोजन.

– पं.हृदयनाथ मंगेशकर, सुरेश भट, ग्रेस, रूपा कुलकर्णी यांनी नागपूरच्या घटाटे बंगल्यात १०० अभंगांची निवड केली. त्यातून  १. आळंदी वल्लभा व २. आंधळी गौळण या कॅसेट्स यशवंत देव, शोभा जोशी, अजित कडकडे यांच्या आवाजात काढल्या.

– आंधळी गौळणचे संगीत कार्यक्रम नागपूर, पुणे, अमरावती, औरंगाबादला झालेत.

– पंढरपूर व मुंबई येथे लोकगीतांचा कार्यक्रम प्रा. डाॅ. रूपा कुलकर्णी व आय.टी.आर.तर्फे अशोक जी. परांजपे यांनी घडवून आणला. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन यातही झाला.

– दै.‘तरूणभारत’  मध्ये ‘चेतना चितांमणीचे गावी‘’  हे सदर ३ वर्षे (१९८० ते १९८३) चालविले व ते पुस्तक रूपाने प्रकाशित.

– दै. लोकमत मधे एक सदर चालविले.

– हॉलंडला लायडन शहरी भक्ति कान्फरन्स मध्ये शोध निबंधवाचन – ‘‘काँट्रीब्युशन ऑफ गुलाबरावमहाराज इन शांकरवेदान्त’’ डिसेंबर (१९८५)

– श्री बाबाजीमहाराज पंडित यांच्या जन्मशताब्दी निमित्य पहिले श्रीगुलाबराव महाराज संतसाहित्य संमेलन. महाराष्ट्रात

राममंदिर रामनगर नागपूर शहरी. श्री. धुंडामहाराज, श्री.पांडुरंगशास्त्री आठवले, श्री.अनंतराव आठवले, श्री.किसनमहाराज साखरे, गो. नि. दांडेकर वगैरे मंडळींनी सहभाग दिला. ५२ संशोधन पेपर्स वाचण्यात आले.

– श्री महाराजांच्या ग्रंथांची मूळ हस्तलिखिते आणि २० खंडांची प्रथमावृत्ती यांचे व श्रीबाबाजीमहाराज पंडितांच्या ग्रंथांचे लेमिनेशन श्री मदन जोशी यांनी खूप कष्ट घेऊन करुन ठेवले.

– आफ्रिकेतील डर्बन शहरी भक्ति कान्फरन्समध्ये शोधनिबंध – ‘सर्वधर्म समन्वय’ (जुलै १९९५)

– विश्व संत साहित्य प्रतिष्ठान ची स्थापना १९७८

– संतसाहित्यावर शोधनिबंधांच्या वाचनाचे मासिक आयोजन ३-४ वर्षे

– बाबासाहेब व मातोश्री ताराबाई घटाटे ट्रस्ट निर्मिती (१९९७) या ट्रस्टमार्फत संत साहित्याच्या अभ्यासकांना दरवर्षी पुरस्कार देणे. (अनाथ विद्यार्थीगृह यांच्या सहकार्या ने. )

– श्रीज्ञानेश्वरकन्या पुरस्कार- वेदव्यास प्रतिष्ठान पुणे तर्फे (आचार्य किशोरजी व्यास) (७-१२-०१)

– प्रसाद, तरूणभारत, महाराष्ट्र टाइम्स, नवभारत, युगवाणी, जीवनविकास इ. मासिकांमधे लेखन.

– श्री गुलाबराव महाराजांच्या अनेक पुस्तकांचे संपादन आणि प्रकाशन.

– मराठी सांस्कृतिक विश्वकोश व संचरित्रकोशामधे लेखन

– श्रीगुरूजी समग्र खंडाच्या संपादनात सहभाग. १ ल्या व १२ व्या खडांचे पूर्ण संपादन.

– वृत्तपत्रातून अध्यात्मविषयावर कॉलम लिहीण्याचा पहिला मान नागपूरातील तरुण भारत वृत्तपत्राला मिळवून दिला. त्यानंतर सर्व वृत्तपत्रातून अध्यात्मविषयांवर कॉलम लिहीणे सुरु झाले.

– पहिले संतसाहित्य संम्मेलन श्रीगुलाबराव महाराजांच्या जन्मशताब्दी निमित्त १९८१ मध्ये नागपूरला घेण्यात आले. त्यानंतर संतसाहित्य संम्मेलनाची परंपरा सुरु झाली.

– सन १९६० साली श्रीगुलाबराव महाराजांच्या भक्तिपदतीर्थामृत या ग्रंथाच्या प्रकाशनावर इसवी सन या ऐवजी कलि वर्ष लिहीण्याची परंपरा सुरु केली. रा. स्व. संघाच्या जेष्ठ प्रचारक कै. मोरोपंत पिंगळे यांनी भारतभर युगाब्द ५००० हे लिहीण्याचा उपक्रम सुरु केला. नंतर कलियुगाब्द ही शब्धयोजना सुरु झाली.

सहभाग

बाबासाहेब आपटे स्मारक समिती. / अनाथ विद्यार्थी गृह स्मारक समिती, / विश्व हिन्दू परिषद / विश्व संस्कृती अध्ययन केंद्र./ विश्व पुनर्निर्माण संघ./ विदर्भसंशोधन मंडळ. भक्तिधाम चांदूरबाजार. / नरककेसरी प्रकाशन-तरूणभारत (भूतपूर्व संचालक) / नागपूर नागरिक सहकारी बँक (भूतपूर्व संचालक) / गोविज्ञान केंद्र.